Dailyhunt
सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप.

सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप.

सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका युवा वकिलाने आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत.

माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या, असे चिठ्ठीत लिहिले आहे. जन्मदात्या आईच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर श्रीकांत मंद्रूपकर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीमध्ये सागरने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या आईला जबाबदार धरले आहे. त्याने चिठ्ठीत म्हटले आहे की, “आईकडून होणारा सततचा होणारा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती.”

सागर मंद्रूपकर यांचे वडील सरकारी नोकरदार असून, त्याची बहीण विवाहित आहे. सागर आणि त्यांच्या आईचे मंगळवारी रात्री भांडण झाले होते. या भांडणानंतर सागरने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद सोलापुरातील सिव्हिल पोलिस चौकी येथे करण्यात आली आहे. सध्या विजापूर नाका पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार! राजकीय नेत्याची वाढदिवशीच भर स्टेजवरच हत्या…

सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka