पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट बस स्थानकात बंद असलेल्या बसमध्ये कंडोम, साड्या, चादरी आढळून आल्या आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी याचा पर्दाफाश केला आहे. तसेच पुण्याच्या 4 जुन्या बसमध्ये लॉजिंग सुरू असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
स्वारगेटच्या बसस्थानकात खराब असलेल्या बसमध्ये साड्या, कंडोम, दारुच्या बाटल्या, खराब चादरी आढळल्याचे समोर आले आहे. स्वागरगेट स्थानकात पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या संमतीने हे सुरू आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. 20 सुरक्षारक्षक तैनात असताना या सुरक्षारक्षकांच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले असून सुरक्षारक्षकाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.
वसंत मोरे म्हणाले, एसटीचे लॉजिंग सुरू आहे. चादरी, साड्या, कंडोमची पाकिट पडलेली आहेत. रोज येथे 100 कंडोम पडलेले असतात. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थित रोज येथे बलात्कार होत आहे. बाकीच्या गोष्टी येथे सुरू आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोर हा प्रकार घडत आहेत. राजरोसपणे हा प्रकार घडत आहे. आगारप्रमुख आणि सुरक्षारक्षकांचे नीलंबन झाले आहे. चार गाड्या येथे उभ्या आहेत. स्क्रॅपला पाठवायच्या गाड्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, वसंत मोरे यांनी आज (बुधवार) दुपारच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी स्थानक गाठले. यावेळी स्वारगेट स्थानकात ठाकरे यांच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आली. वसंत मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून झाल्यावर थेट आगार प्रमुखांचे कार्यालय गाठले. त्यांनी आगार प्रमुखांकडून घटनेची माहिती घेतली तसेच तुम्हाला हा प्रकार कधी माहिती पडला, असे विचारले. आगार प्रमुखांकडून व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तेथील कार्यालयाच्या काचा फोडल्या आहेत.
पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…
संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…
The post स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

