नाशिक : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना वाहनाला भीषण अपघात झाला असून, दोन मुलींसह जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.
वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेने अंत्यविधीसाठी कुटुंबिय मालेगावला नेत होते. त्यावेळी रुग्णवाहिकेपाठोपाठ कुटुंबिय कारने निघाले असताना कारची धडक महामार्गावर उभा असणाऱ्या कंटेनरला बसली. पहाटे चार वाजता झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक नात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली घुसलीय. अपघातानंतर घटनास्थळावरची दृश्ये थरकाप उडवणारी होती. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत आणि विकास चिंतामण सावंत अशी आहेत. तर अपघातात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

