Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं.

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणी 13 जणांना ताम्हिणी घाटातून अटक करण्यात आली आहे. जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. मात्र, पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरांच्या बहि‍णींना पोलसांनी अटक केली होती. त्यानंतर, ताम्हिणी घाटातून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी अनेक पथके नेमून शोधासाठी रवाना केली होती.

पुणे शहरातील नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) रात्री साडेआठच्या सुमारास हल्ला केला होता. आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले होते. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, वनराज आंदेकर राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. राष्ट्रवादी पक्षाकडून ते नगरसेवकदेखील झाले होते. मात्र पूर्ववैमन्स, कौटुंबिक कलह, संपत्तीवरून वनराज यांच्या खुनाचे प्राथमिक कारण आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka