Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला.

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला.

पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर आंदेकर टोळीचे प्रमुख आणि मृत वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं, माझ्या निरपराध मुलाला का मारलं? असा सवाल बंडू आंदेकरांनी केला आहे.

वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंडू आंदेकर म्हणाले, ‘मी शपथ घेऊन सांगतो असं काही करणार नाही. मी आता न्यायाची वाट बघेल. पण आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं, निरपराध मुलाला का मारलं? वनराज नाही तर मी टार्गेट होतो. त्यांना आम्हाला मारायचं होते. पण वनराजची हत्या झाली, वनराजची काही चूक नव्हती. मी गुन्हेगारी सोडून आता अनेक वर्षे झाली आहे. आमच्या घरात आता कोणीच गुन्हेगार नाहीत. दोन भाऊ, बहीण, बायको, मुलगा नगरसेवक झालेत पण आमचा दरारा बघवत नाही म्हणून असे करण्यात आले आहे. आम्ही कोणाचे काही बिघडवलं नाही तरी आम्हाला अडकवतात. सोमनाथ गायकवाड याला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला, आणि माझ्याच मुलाची वनराजची हत्या केली. मला न्यायाची अपेक्षा आहे, आता मी बदला वैगेरे घेणार नाही. मी काही केलं तर आता कुटुंब उघडं पडेल.’

दरम्यान, वनराज आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर आले आहे. पूर्ववैमानस्य आणि बदला घेण्यासाठीच आंदेकर यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka