Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: न्यायालयाच्या आवारतच नवऱ्याला चपलेने चोपलं.

Video: न्यायालयाच्या आवारतच नवऱ्याला चपलेने चोपलं.

खनौ (उत्तर प्रदेश) : न्यायालयाच्या आवारतच पत्नीने पोलिस आणि वकिलांसमोर पतीला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पती-पत्नी लखनऊच्या फॅमिली कोर्टात आले होते.

पत्नीच्या पारा चढला आणि तिनं पोलीस आणि वकीलांसमोरच पतीला मारायला सुरुवात केली. पायातील चपल काढून तिने नवऱ्याला मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओत पाहायला मिळते की, एक महिला एका पुरुषाला चपलेने मारत आहे. पुरुषाच्या बचावासाठी पोलीस आणि वकील आले आहेत. ते त्या महिलेला अडवण्याचा आणि पुरुषाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण, महिला वकील आणि पोलिसांनाही जुमानत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka