Dailyhunt
Video: पोलिसकाकाने 'ऑन द स्पॉट' लावला चोरट्यांचा निकाल.

Video: पोलिसकाकाने 'ऑन द स्पॉट' लावला चोरट्यांचा निकाल.

न्यूयॉर्क: सोशल मीडियावरअनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओंना नेटिझन्सची पसंती मिळते. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स पोलिसांच्या शौर्याचं कौतुक करत आहेत.

दोन चोरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला लूटण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी चोरांवर गोळीबार केला.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास रस्त्याने जात असताना, त्यावेळी दुचाकीवरुन दोन जण येतात. रस्त्यावर कोण नसल्याचे पाहून हे दोघंही युटर्न घेऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीच्या जवळ येऊन थांबवतात. आरोपी चाकूचा धाक दाखवून त्या व्यक्तीच्या पाठिवरची बॅग हिसकावून घेतात आणि दुचाकीवर बसून पसार होण्याच्या प्रयत्नात असता. अगती त्याचवेळी पोलिस दुचाकीवरून येत असतो. पोलिस येत असल्याचे दिसतात संबंधित व्यक्ती आरोपींच्या दुचाकीला धक्का मारतो. चोरटे दुचाकीसह रस्त्यावर कोसळतात. पोलिस आल्याचे पाहाताच चोरटे उठून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण पोलिस क्षणाचाही विलंब न करता दोघांवरही गोळ्या झाडतो. पोलिसाने केलेल्या गोळीबारात दोन्ही आरोपी रस्त्यावर निपचित पडतात.

दरम्यान, व्हायरल होणाारा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती पुढे आलेली नाही. पण, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स पोलिसाचे कौतुक करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka