Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्.

Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्.

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये, एक कारचालक युवकाला बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे.

काळूस गावात चारचाकी गाड्यांमधून आलेल्या टोळक्याने गावात दहशतीचा थरार माजवत संबंधित व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि एकाला गाडीच्या बोनटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अक्षय डुंबरे यांनी त्यांच्या हायवा गाडीच्या कामाचे पैसे आरोपींकडे मागितल्याने हा वाद झाल्याची माहिती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka