Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन.

Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन.

पुणे : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि कॅफेतील कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे, तसेच तोडफोड करणे पुणे पोलिस दलातील एका उपनिरीक्षकाच्या अंगलट आले आहे. संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलिस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पुणे शहरातील डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांना एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तन व तोडफोड केल्याच्या आरोपावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जूनच्या रात्री पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम हे नाईट ड्युटीवर (रात्रीच्या गस्तीवर) तैनात होते. रात्री साधारण पावणेदोन (१:४५) वाजेच्या सुमारास ते शिरोळे रस्ता येथील एका कॅफेमध्ये पोहोचले. त्यावेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती. पीएसआय संदीप कदम यांनी कॅफेमध्ये प्रवेश करतात. काउंटरपाशी जात थेट तिथे ठेवलेले कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थांवर काठी मारून ते खाली पाडले आणि साहित्याचे नुकसान केले. यानंतर त्यांनी तिथे बसलेल्या ग्राहकांना तात्काळ उठून बाहेर जाण्यासाठी सांगितले. पोलिसाच्या या अचानक झालेल्या अवतारामुळे कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचारी प्रचंड घाबरले होते.

संबंधित सर्व प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संदीप कदम यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे, पोलिस दलाच्या शिस्तीला काळिमा फासणारे आणि विभागाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पीएसआय संदीप कदम यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…

पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…

पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka