पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विदयार्थी यांना जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीतीने अटक केली आहे.
चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये २८/०९/२०२४ रोजी १९/३० वाजे चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील फिर्यादी पौंर्जेदाई कामेई (वय १९, धंदा शिक्षण रा. श्री भास्कर मधुकांत कोल्हे यांचे घरी भाडेकरु, प्लॉट नं २०, फ्लॅट नं १०५, दुसरा मजला, आनंद नगर, स्वीमींग पुल रोड, जे मार्ट चे मागे, गंगानगर जुनी सांगवी पुणे. मुळपत्ता- राज्य नागालँड) व त्याचा मित्र राकेश रॉय असे मिळुन सदर ठिकाणी सायकलींग ट्रॅकींगकामी गेले असता सदर ठिकाणी ०४ अनोळखींनी येवून फिर्यादी व त्याच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करुन त्यांचेकडून दोन मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुण – २०,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने काढुन घेवुन चोरी करुन नेला आहे, म्हणुन फिर्यादी यांनी ०४ अनोळखी इसमाविरुध्द दिले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ७७७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११,३५१ (३), ३५२, ३(५) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम-३७(१) (३), सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे घटनास्थळी वरिष्ठांनी भेट देवुन दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी
१) अजिंक्य अशोक बोबडे, वय १८ वर्ष, रा- गुरुकृपा बिल्डींग, दुसरा मजला, रुम नं.०३, संत तुकाराम नगर वाघजाई चौकाजवळ, नवी सांगवी पुणे.
२) निखील बाबासाहेब डोंगरे, वय १८ वर्ष, रा- साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, डी. पी. रोड औंध पुणे. व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा हददीत / परहददीत शोध
घेवून त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने काढुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,२१,२००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील तपास पथकाचे अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक / नरेंद्र पाटील, पोलिस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलिस हवालदार/ श्रीकांत वाघवले, पोलिस हवालदार/ बाबुलाल तांदळे, पोलिस हवालदार/ सुधाकर माने, पोलिस हवालदार / इरफान मोमीन, पोलिस हवालदार/ बाबासाहेब दांगडे, पोलिस हवालदार/ श्रीधर शिर्के, पोलिस हवालदार/ किशारे दुशिंग, पोलिस हवालदार/संदिप दुर्गे, पोलिस हवालदार / विशाल शिर्के, पोलिस अंमलदार /बाबासाहेब भांगले, पोलिस अंमलदार/प्रदिप खरात, पोलिस अंमलदार/ श्रीकांत साबळे, पोलिस अंमलदार / प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.
पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
The post विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

