Dailyhunt
विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव.

विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव.

बीजिंगः चीनमधील एका लग्नात मुलाच्या आईला लग्नाच्या दिवशी समजले की आपली होणारी सून ही आपलीच हरवलेली मुलगी आहे. लग्नाच्या दिवशी ही घटना उघड झाल्यानंतर धक्क्याबरोबरच आनंद झाला.

नवऱ्या मुलाची आई लग्नाची वरात घेऊन नवरीच्या घरी गेली होती.

यावेळी नवरी वरातीच्या स्वागतासाठी दारामध्ये आल्यानंतर नवऱ्या मुलाच्या आईने नवरीच्या हातावर एक खूण पाहिली. त्यानंतर तिने मुलीची चौकशी करायला सुरूवात केली.

नवरीच्या आई-वडीलांनी सांगितले की, ‘आम्हाला ही मुलगी लहान असताना रस्त्याच्या कडेला सापडली होती. त्यामुळे आम्ही तिला दत्तक घेतले आणि लहानाचे मोठे केले. घडलेला प्रकार ऐकल्यानंतर नवऱ्या मुलाच्या आईने २० वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि त्यावरून हे पक्के झाले की ती हरवलेली मुलगी आहे.’

नवऱ्या मुलाच्या आईने आपली मुलगी हरवल्यानंतर एक मुलगा दत्तक घेतला होता. तोच हा नवरा मुलगा होता. अखेर दोघांनाही दत्तक घेतले असल्याने त्यांच्यात पूर्वीचे कोणतेही नाते नव्हते ही निश्चित झाले आणि मग या दोघांचे लग्न लावण्यात आले.

Video: कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन्…

शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

The post विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka