Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख.

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख.

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओला लाइक करण्यास सांगून पैसे लुबाडण्याचा सध्या नवा फंडा समोर आला आहे. एका दुकानदाराला त्याचा मोठा फटका बसला आहे.

एका दुकानदाराला युट्युबवर काही छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी 123 रुपये आणि 492 रुपये मिळाले.

त्यामुळे तो खूश झाला. मग त्याला एका टेलिग्राम ग्रूपवर अ‍ॅड करण्यात आले. तिथे त्याला पैसे जमा केले तर त्यावर कमिशन दिले जाईल असे सांगितले. त्यामुळे त्याने 56.7 लाख रुपये जमा केले. त्यासाठी त्याने लोकांकडून पैसे उसने घेतले. त्यानंतर घोटाळेबाजांनी त्याच्याशी कोणताच संपर्क ठेवला नाही. त्यामुळे आपण फसल्याचे त्या दुकानदाराला लक्षात आले.

दरम्यान, अशा प्रकारचे अनेक घोटाळे सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. 'डिजिटल अरेस्ट स्कॅम' हाही त्यापैकीच एक आहे. यात घोटाळा केला असा सांगून ग्राहकांनाच धमकावले जाते, पोलिस अटक करतील अशी भीती दाखवली जाते. त्यानंतर शेवटी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते. अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

The post Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka