Dailyhunt
यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसुती करायला गेला अन्.

यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसुती करायला गेला अन्.

तिरुअनंतपुरम (केरळ): एक व्यक्ती यूट्यूब व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसुती करायला गेला पण यामध्ये पत्नी आणि नवजात मुलाला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

शमीरा बीवी असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती नायस (वय ३६) याच्यावर हत्येचा आणि आयपीसीच्या कलम 315 (मुलाला जिवंत जन्माला न येऊ देणं किंवा जन्मानंतर मारण्याच्या उद्देशाने केलेलं कृत्य) च्या आरोपात अटक केली आहे. शमीरा बीवी यांच्या यापूर्वी तिच्या तीन सिझेरियन प्रसूती झाल्या होत्या. मंगळवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीरा बीवी यांना घरामध्ये असताना प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. आरोपी नायसच्या पहिल्या पत्नीने नायससोबत घरी यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसूती करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. शमीरा कोमात गेल्यावर नायसने तिला रुग्णवाहिकेत एका खासगी रुग्णालयात नेलं, तिथे आई आणि नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आले.

तिरुअनंतपुरम नगरपालिकेचे नगरसेवक यू दीपिका यांनी सांगितले की, ‘आरोपी नायस आपल्या पत्नीला आधुनिक उपचार देण्याच्या विरोधात होता. आशा कार्यकर्त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला असता नायसने त्यांना पत्नीला भेटू दिले नाही. युट्युब व्हिडिओजच्या मदतीने आपल्या इतर मुलांचाही घरी जन्म झाल्याचा दावा त्याने केला आहे. महिलेला रुग्णालयात जायचे होते, पण तिला तिच्या नवऱ्याची भीती वाटत होती. जर तिने त्याचा निर्णय मान्य केला नाही तर तो तिला सोडून देईल, अशी धमकी आरोपीने दिली होती.’

महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…

धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…

The post यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसुती करायला गेला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka