Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युवकासोबत ठरला 500 रुपयांत शरीरसंबंधचा सौदा अन् केलं कांड.

युवकासोबत ठरला 500 रुपयांत शरीरसंबंधचा सौदा अन् केलं कांड.

मुंबई: मुंबईच्या गिरगाव परिसरात एका युवकासोबत फसवणुकीची धक्कादायक प्रकार घडला आहे. शारीरिक संबंधाच्या आमिषाला बळी पडून अनोळखी महिलेवर विश्वास ठेवला आणि अडकला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

एका युवतीने ५०० रुपयांत शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून एका युवकाला लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सीएसएमटी स्थानकात असताना एका अनोळखी युवतीने त्याच्याशी संपर्क साधून ५०० रुपयांत शरीरसंबंध ठेवण्याचे ठरले. त्यानंतर तिने तक्रारदाराला टॅक्सीने पठे बापूराव मार्गावरील भारत भवन हॉटेलजवळील इमारतीत नेले. पहिल्या मजल्यावरील खोलीत गेल्यानंतर तिच्यासोबत आणखी तीन महिला खोलीत आल्या. चौघींनी मिळून तक्रारदाराला धमकावत बदनामीची भीती दाखवली. त्याच्या मोबाईलवरून २२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले तसेच १३ हजार रुपये रोख रक्कमही हिसकावली. घटनेनंतर पीडित युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तीन आरोपी महिलांना ताब्यात घेतले असून, एकीचा शोध सुरू आहे.

अटक झालेल्या आरोपींची नावे माजिदा नूर सरदार गाझी, रुपा विश्वनाथ दास आणि नसिम्मा जमान शेख अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर…

75 वर्षांच्या आजोबांचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; हनिमूनच्या रात्रीच मृत्यू…

कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…

विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या बाबा चैतन्यनंदच्या आवळल्या मुसक्या…

The post युवकासोबत ठरला 500 रुपयांत शरीरसंबंधचा सौदा अन् केलं कांड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka