Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अँटी-टोबॅको फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रवेशिका सादर करण्याची मुदत २० मेपर्यंत

अँटी-टोबॅको फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रवेशिका सादर करण्याची मुदत २० मेपर्यंत

अँटी-टोबॅको फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रवेशिका सादर करण्याची मुदत २० मेपर्यंत

पणजी: गोवा मनोरंजन संस्था (ESG) आणि गोवा डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या सार्वजनिक दंतआरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे २०२६ रोजी ८वा गोवा अँटी-टोबॅको फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे.

जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त हा महोत्सव आयोजित केला जात आहे.

तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेत 'गोवा विभाग' आणि 'राष्ट्रीय विभाग' असे दोन विभाग असणार असून गोवा तसेच देशभरातील चित्रपट निर्मात्यांना आपली कलाकृती सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चित्रपट प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत यापूर्वी १३ मे २०२६ होती. मात्र स्पर्धकांच्या विनंतीनंतर ही मुदत आता २० मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तंबाखू व्यसन, धूम्रपानामुळे होणारे आरोग्यविषयक धोके, निष्क्रिय धूम्रपानाचे परिणाम, सामाजिक दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक जनजागृती या विषयांवरील लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट आणि जनजागृतीपर व्हिडीओंना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे.

स्पर्धेचा अर्ज तसेच नियम व अटी ESGच्या अधिकृत संकेतस्थळावर "8th Goa Anti-Tobacco Film Festival Registration Form" या नावाने उपलब्ध आहेत.

चित्रपट आणि सार्वजनिक आरोग्य जनजागृती यांची सांगड घालून तंबाखूमुक्त समाजाचा संदेश देणारा हा महोत्सव गोव्यातील महत्त्वाचा सामाजिक उपक्रम म्हणून ओळखला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Rashtramat