Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सक्रिय

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सक्रिय

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सक्रिय

णजी : आगामी २०२७ गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (जीपीसीसी) शनिवारी जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.

तळागाळातील संघटना अधिक मजबूत करण्यासह जनसंपर्क वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि कार्याध्यक्ष एम. के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष शशांक नार्वेकर, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष असिझ जॅकलिस नोरोन्हा, कुशावती जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजेश शिवदास वेर्णेकर आणि म्हादई जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष मंगळदास व्ही. नाईक उपस्थित होते.

बैठकीत विविध जिल्ह्यांतील सुरू असलेल्या संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. पक्षाची पोहोच अधिक व्यापक करण्यासाठी तसेच राज्यातील विविध घटकांशी संवाद वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना गिरीश चोडणकर यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी एकजूट, शिस्त आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क यांचे महत्त्व अधोरेखित केले.

पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, २०२७ विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा आणि समन्वयाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Rashtramat