Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू.?

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू.?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश महाधू फटांगडे (वय अंदाजे ३८ वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश फटांगडे हे शर्यतीदरम्यान गाडा अंगावर आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, शिक्रापुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत शर्यतीचे आयोजन नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शर्यतीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, नियंत्रण व्यवस्था तसेच नियमांचे पालन करण्यात आले नव्हते, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिक्रापुर पोलिस स्टेशन तक्रारीनुसार, संबंधित आयोजक व जबाबदार व्यक्तींनी आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे निष्काळजीपणा झाला असुन, त्यातूनच प्रकाश फटांगडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अशा शर्यतींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिक्रापुर पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरु केला असून, सर्व बाजूंनी चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka