Dailyhunt
Mumbai: लोकल रेल्वे मेट्रोशी कनेक्ट होणार; 91 कोटींचे टेंडर प्रसिद्ध

Mumbai: लोकल रेल्वे मेट्रोशी कनेक्ट होणार; 91 कोटींचे टेंडर प्रसिद्ध

Mumbai Metro

मुंबई (Mumbai): मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे आणि आधुनिक युगाची ओळख बनलेली मेट्रो या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना एकाच धाग्यात गुंफण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने घेतला आहे.

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेवर प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी विशेष आनंददायी आहे. त्यासाठी ९३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Adani: मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अदानी समूहाला; तब्बल सतराशे कोटींचे कंत्राट

अनेकदा मेट्रोने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवासासाठी पुन्हा रेल्वे स्थानकाकडे धाव घ्यावी लागते. यामध्ये रस्त्यावरील वाहतूक कोंडी, ऊन-पाऊस आणि गर्दीचा सामना करत रस्ता ओलांडणे हे प्रवाशांसाठी अत्यंत जिकिरीचे ठरते. नेमकी हीच अडचण ओळखून एमएमआरडीएने विक्रोळी मेट्रो स्थानक आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानक यांना थेट एका पादचारी पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमारे सातशेचाळीस मीटर लांबीचा हा भव्य पादचारी पूल उभारण्यासाठी ९३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलामुळे आता प्रवाशांना मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची गरजच उरणार नाही. ते थेट या पुलावरून चालत कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात प्रवेश करू शकतील किंवा रेल्वेने आलेल्या प्रवाशांना थेट मेट्रो पकडता येईल.

Dombivli: साहित्य-कलेची पंढरी आता होणार 'क्रीडानगरी'

विशेष म्हणजे त्यासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून टेंडरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. येत्या अठरा महिन्यांच्या कालावधीत हा पूल प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

प्रवाशांच्या सोयीचा विचार करता या पुलाचे रूपही अत्यंत आधुनिक असणार आहे. प्रवाशांना पायऱ्या चढण्या-उतरण्याचा त्रास होऊ नये म्हणून सरकते जिने आणि उदवाहकांची म्हणजेच लिफ्टची सोय करण्यात येणार आहे. तसेच महिला आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण पुलावर अत्याधुनिक सीसीटीवी कॅमेरे बसवले जातील.

नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

या निर्णयामुळे केवळ मेट्रो आणि रेल्वेच जवळ येणार नाहीत, तर या स्थानकांच्या आसपास असणारे बेस्ट बस थांबे आणि रिक्षा-टॅक्सी फलाट गाठणेही सोपे होणार आहे. सुरुवातीच्या काळात मेट्रोला मिळणारा प्रतिसाद जेमतेम होता, परंतु आता मुंबईकर या नव्या वाटेवर चालू लागले आहेत.

भविष्यात अशा प्रकारे दोन भिन्न वाहतूक व्यवस्थांचे मनोमिलन झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि अखंडित होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama