Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

Trimbakeshwar Temple Nashik

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सहापदरी रस्ता तयार करताना दोन्ही बाजुंनी पादचारी मार्गाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत.

यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर दिंड्यांसाठी २० किलोमीटर लांबीचा स्वतंत्र मार्ग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा प्रवास होणार सुसाट; कल्याण-माळशेज महामार्ग कात टाकणार

त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज यांचा यात्रोत्सव असतो. यावेळी राज्यभरातील वारकरी दिंड्यांसह त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. तसेच आषाढ वारीसाठी संत निवृत्तीनाथ यांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे जात असतो. श्रावण महिन्यात हरिहर भेट सोहळा होत असतो. त्यावेळीही हजारो भाविक पायी त्र्यंबकेश्वर येथे जात असतात.

या दिंडी सोहळ्यातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाला वाहतूक नियोजन करावे लागते. त्याचप्रमाणे नाशिकहून प्रस्तावित वाढवण बंदराला जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरमार्गे हाच एकमेव रस्ता आहे. यामुळे वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर या रस्त्यावरील अवजड वाहतूक वाढणार आहे. याशिवाय सिंहस्थ काळात या नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते.

Nashik: डीपीसीच्या उरलेल्या 30 टक्के निधी नियोजनाचे अधिकार, जबाबदारी कोणाची?

या सर्व बाबी लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरणने नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा राज्यमार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिंडी सोहळ्यातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने गांभीर्याने घेतला असून त्यासाठी या सहा पदरी मार्गाच्या दोन्ही बाजूनी पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा या रस्त्याच्या आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

समृद्धी महामार्गाची 'ती' 3 टेंडर रद्द; मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले कारण?

सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर केलेला आहे. आता नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणने या रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी मिळून १०० मीटर जमीन ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे आधीच्या सहा पदरी रस्त्याच्या आराखड्यात पादचारी म्हणजे दिंडी मार्ग समाविष्ट करण्यात येणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama