मुंबई (Mumbai): देवनार डम्पिंग ग्राउंडवरील (Devnar Dumping Ground) सुमारे १८५ लाख मेट्रिक टन साचलेला जुना कचरा आता शास्त्रोक्त पद्धतीने हटविण्यात येणार आहे.
हे २,५४० कोटी रुपयांचे टेंडर नवयुग इंजिनिअरिंग कंपनीला मिळाले आहे. कंपनीने महापालिकेच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत ७.२९ टक्के कमी दराने हे टेंडर भरले आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या कामाला सुरवात होणार आहे.
राज्य सरकारचा 'झिरो रॉयल्टी'च्या धोरणाबाबत मोठा निर्णय; महसूलास कात्रीराज्य सरकारने देवनार डम्पिंग ग्राउंडमधील १२४ एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या जागेत कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाणार आहे. तीन वर्षांत ही जागा रिकामी केली जाणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने टेंडर काढले होते.
या टेंडरला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. हे कंत्राट नवयुग इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला मिळाले असून त्यांनी महापालिकेच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत ७.२९ टक्के कमी दर सूचवला आहे.
Devendra Fadnavis: पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी तातडीने भूसंपादन कराराज्य सरकारने पाच-सहा महिन्यांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील २३५ एकरपैकी मुंबई महापालिकेस आवश्यक असलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रापैकी १२४ एकर जागा धारावी पुनर्विकासाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
डम्पिंग ग्राऊंडवरील ७५ एकरवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. तर उर्वरित जागा महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी उपलब्ध होणार आहे.
Ajit Pawar: आता 'ती' कामे रोबोटिक मशीन्सच करणारराज्य सरकारने देवनारची जागा ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबई महापालिकेला दिली होती. शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार महापालिकेला ही जागा तीन वर्षांत रिकामी करावी लागणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट महापालिकेच्या घनकचऱ्यातून वीजनिर्मिती करणे हा आहे.

