Dailyhunt
Nashik: मंत्री कोकोटेंनी सूचवलेल्या रस्त्यासाठी खासदार वाजेंनी आणला केंद्राचा निधी

Nashik: मंत्री कोकोटेंनी सूचवलेल्या रस्त्यासाठी खासदार वाजेंनी आणला केंद्राचा निधी

Manikroa Kokate, Rajabhau Vaje, Nashik

नाशिक (Nashik) : राज्याचे क्रीडा व युवकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागील आठवड्यात कुंभमेळा निधीतून नाशिक व सिन्नर यांना जोडणारा समांतर रस्ता तयार करण्याची सूचना महानगर विकास प्राधिकरणकडे केली होती.

त्यानंतर या आठवड्यात केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मागणानुसार या रस्त्यासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

सिन्नरच्या राजकारणात मंत्री कोकाटे व खासदार वाजे यांच्यातील छुपा समझोता झाल्याची त्यांच्या विरोधकांची चर्चा असताना नाशिक व सिन्नर यांना जोडणा-या नाशिक-पुणे महामार्गाला समांतर रस्त्याबाबत एका आठवड्याच्या अंतराने दोन्ही नेत्यांच्या भूमिकेचा हा योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे.

Tender Scam: नाशिक जिल्हा परिषदेने गाठला अनियमिततेचा कळस; मर्जीतील ठेकेदारांसाठी वाट्टेल ते!

नाशिक शहर व सिन्नर यांना जोडण्यासाठी नाशिक-पुणे महामार्ग हा एकमेव जवळचा पर्याय आहे. आपत्कालीन परिस्थितीत भगूरमार्गे घोटी-सिन्नर या राज्यमार्गाचा वापर केला जातो. मात्र, तो मार्ग गैरसोईचा आहे. त्यातच नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे.

या काळात सिंहस्थासाठी देशभरातून येणारे भाविक नाशिकहून शिर्डीला जाण्यासाठी तसेच शिर्डीवरून नाशिकला मोठ्यासंख्येने येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. नाशिक येथून शिर्डीला जाण्यासाठी सिन्नरपर्यंत नाशिक-पुणे महामार्गाचा एकमेव पर्याय आहे. त्यातच सिन्नर येथील दोन औद्योगिक वसाहतीमुळे या दोन शहरांदरम्यान या महामार्गावर मोठी वाहतूक असते. तसेच मोहदरी घाटामुळेही वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असते.

Nashik: नाशिककरांसाठी गुड न्यूज! सिंहस्थापूर्वीच फुटणार प्रमुख 12 चौकांतील वाहतूक कोंडी

सिंहस्थ काळात या मार्गावरून वाहतून आणखी वाढणार असल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे सिन्नर व नाशिक यांच्या दरम्यान नाशिक-पुणे महामार्गाला समांतर मार्ग होण्याची गरज होती. तसेच सिन्नर शहराच्या पश्चिम दिशेकडील गावांना थेट भगूर, देवळाली कॅम्प येथे जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज ओळखून खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) या रस्त्याला मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते.

यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन सिन्नर शहर ते सरदवाडी- पास्ते - जामगाव - विंचूर दळवी या महत्त्वाच्या राज्य महामार्गाच्या उभारणीसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याच्या उन्नतीकरणामुळे सिन्नर, जामगाव, सरदवाडी, विंचूर दळवी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

BMC: वरळीच्या आणखी एका मोक्याच्या भूखंडाचा होणार लिलाव!

या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून रखडलेली व प्रलंबित असलेली मागणी आता पूर्ण होत आहे. हा रस्ता सिंहस्थापूर्वी पूर्ण झाल्यास त्याचा भाविकांना मोठा फायदा होऊ शकणार आहे.

सिंहस्थ परिक्रमा मार्गाला जोडणार

सिन्नर ते विंचूरगवळी हा राज्यमार्ग सिंहस्थानिमित्त मंजूर केलेल्या नाशिक बाह्यवळण (सिंहस्थ परिक्रमा) मार्गाला दोनवाडे- विंचूर गवळी शिवारात जोडला जाणार आहे. यामुळे नाशिकवरून सिन्नरला जाण्यासाठी आपत्कालिन परिस्थितीत वाहनांना सिंहस्थ परिक्रमा मार्गाने थेट जाता येणार आहे. याशिवाय या रस्त्यामुळे या भागातील व्यापार-उद्योगांना चालना मिळणार आहे. सिन्नर औद्योगिक पट्टा आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama