Dailyhunt
Pune : औंधमधील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणातील 'तो' अडथळा होणार दूर

Pune : औंधमधील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणातील 'तो' अडथळा होणार दूर

Pune City

पुणे (Pune) : औंधमधील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारे विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास वेग येण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने पोलिस व महापालिका प्रशासनाकडून स्थलांतराच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे.

कार्यालय हटविल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होऊन वाहनचालकांची कोंडीतून सुटका होईल.

Mumbai : 50 वर्षे मुंबईची पाण्याची चिंता मिटली; 'त्या' दोन्ही प्रकल्पातील अडथळे दूर

औंधमधील ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पूलदरम्यानचा बहुतांश रस्ता ३६ मीटरचा झाला आहे. मात्र, औंध पोलिस चौकी व त्यासमोरील विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालय व अन्य एका वास्तूचा रस्ता रुंदीकरणात अडथळा येत होता. कार्यालयांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते.

ब्रेमेन चौकाकडून येणाऱ्या व पिंपरी-चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कार्यालयांच्या अडथळ्यामुळे विरुद्ध दिशेच्या रस्त्यावरून जाण्याची वेळ येते. त्यामुळे यापूर्वी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. रस्ता रुंदीकरणास कार्यालयांची अडचण होत असल्याचे वृत्त 'सकाळ'मध्ये प्रकाशित झाले होते.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेत पोलिस प्रशासनाला सूचना केल्या होत्या.

Pune : 'ही' अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ऑपरेटरची संख्या वाढली

प्रश्‍न तातडीने सोडवून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करण्याची ताकीद उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिस प्रशासनास दिली होती. हा प्रश्‍न निवडणुकांमुळे पुन्हा प्रलंबित होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालयास भेट देऊन पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर कार्यालय स्थलांतरित करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती.

आता कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी गती दिली जात आहे. महापालिकेकडून पोलिसांना दिल्या जाणाऱ्या जागेबाबतची कामे सुरू आहेत. पोलिसांच्या मागणीनुसार तेथे देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतर कार्यालयाच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे.

Pune - Solapur Highway वरील प्रवास होणार सुसाट! 42 किमीच्या उड्डाणपुलामुळे कोंडी फुटणार

पोलिस व महापालिकेकडून एकत्रित व सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालय स्थलांतर करण्यापूर्वी आवश्‍यक दुरुस्तीची कामे केली जात आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून कार्यालय स्थलांतराचे काम होईल. कार्यालय हटविल्यानंतर रस्ता रुंदीकरण पूर्ण होऊन वाहनचालकांची गैरसोय कमी होईल.

- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama