Dailyhunt
Pune : 'ही' अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ऑपरेटरची संख्या वाढली

Pune : 'ही' अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ऑपरेटरची संख्या वाढली

Muralidhar Mohol

पुणे (Pune) : आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. रुग्ण जर अत्यवस्थ असेल आणि त्याला दुसऱ्या मोठ्या शहरात उपचारासाठी घेऊन जायचे असेल तर त्यावेळी हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स) अत्यंत महत्त्वाची ठरते.

Devendra Fadnavis : कधी धावणार बुलेट ट्रेन? CM फडणवीसांनी सांगितला मुहूर्त!

कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी हवाई रुग्णवाहिकेचा वापर होतो. देशात सद्यःस्थितीत ४३ हवाई रुग्णवाहिका असून यातील ३५ या फिक्स्ड-विंग अर्थात विमान आहेत, तर ८ रोटरी विंग अर्थात हेलिकॉप्टर आहेत. या ४३ हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जाते. ही सेवा खर्चिक जरी असली, तरीही अत्यवस्थ रुग्णांना मात्र मोठा आधार मिळत आहे.

याचे भाडे हे अंतरावर, सेवेच्या प्रकारावर तसेच, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधेवर अवलंबून आहे. २०२२च्या 'डीजीसीए'च्या आकडेवारीनुसार देशात ४९ हवाई रुग्णवाहिका होत्या. २०२५ मध्ये मात्र हवाई रुग्णवाहिकेच्या संख्येत थोडी घट झाली. त्यावेळी देशात १९ ऑपरेटर होते. मात्र, आता हवाई रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या ऑपरेटरच्या संख्येत वाढ झाली आहे. १९ हून ही संख्या आता २५ झाली आहे. ही चांगली बाब म्हणावी लागेल.

PMC : बापरे! एकाच सोसायटीला चक्क 24 लाखांचे पाणीबिल

यामध्ये सुविधा कोणत्या?

- व्हेंटिलेटर, मॉनिटर, औषधे

- प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी

- रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवणारे डॉक्टर

- आयसीयू स्तरावरील उपचार प्रणाली

- थेट रुग्णालयाशी संपर्क

प्रकार आणि दर किती?

- हेलिकॉप्टर व विमान असे हवाई रुग्णवाहिकेचे दोन प्रकार आहेत

- हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेचा वापर प्रामुख्याने कमी अंतरासाठी, डोंगराळ भागात अथवा रस्त्याने पोहोचू न शकणाऱ्या भागांसाठी केला जातो

- हेलिकॉप्टर भाडे ३ ते ४ लाख (३०० किमीपर्यंत)

- विमान (फिक्स्ड-विंग) लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी (५०० ते २ हजारहून अधिक किलोमीटर)

- विमान खर्च आठ लाख किंवा त्याहून अधिक (अंतर व सेवा प्रकारावर अवलंबून)

- खर्चाचे दर हे निश्चित नसतात, ते प्रामुख्याने अंतरावर ठरतात

47 वर्षे पूर्ण झालेल्या 'या' रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे घोडे कुठे अडले?

देशात हवाई रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या ऑपरेटरची संख्या वाढत आहे ही चांगली बाब आहे. यामुळे रुग्णांच्या नातलगांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिकेची सेवा अत्यंत महत्त्वाची ठरते.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama