Dailyhunt
Pune : राज्यभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तरी पीएमसीला अधिकारी मिळेना

Pune : राज्यभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तरी पीएमसीला अधिकारी मिळेना

pune

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील (PMC) अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन जागा सुमारे नऊ महिन्यांपासून रिक्त आहेत.

त्या ठिकाणी 'आयएएस' दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, यासाठी महापालिकेचे, लोकप्रितनिधींचे प्रयत्न सुरू होते; मात्र महसूल विभागाने आदेश काढून उपायुक्त महेश पाटील यांना पदोन्नती देऊन पुणे महापालिकेच्या अपर आयुक्तपदी प्रतिनियुक्ती दिली आहे.

महापालिकेच्या आकृतिबंधात असे पदच नसल्याने या नियुक्तीबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Ahilyanagar : पाणीपट्टीत वाढ; तरी योजना तोट्यातच, 25 कोटींची तूट कायम

Devendra Fadnavis पुणे महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागा आहेत. गेल्या वर्षी डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यापैकी खेमणार यांच्या जागी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती शासनाने केली. मात्र अजून दोन जागा रिक्त आहेत. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर ही पदे भरली जातील, अशी शक्यता होती. लोकसभा झाली, विधानसभा झाली तरीही या दोन जागा शासनाने भरलेल्या नाहीत. राज्यभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असले तरी एकाही अधिकाऱ्याला पुणे महापालिकेत नियुक्ती दिली गेली नाही. या रिक्त जागा भराव्यात, यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. तसेच प्रशासनातर्फेही पाठपुरावा सुरू होता.

Pimpri : रावेतला पाच एकर जागेत महापालिका उभारणार भव्य गृहप्रकल्प

उपजिल्हाधिकारी पदावरील महेश पाटील यांची प्रतिनियुक्तीने उपायुक्त पदावर बदली होऊन ते महापालिकेत कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी असून, त्यात सध्या केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून सुमारे १२५ कोटींची कामे सुरू आहेत. हे काम 'महाप्रित' या संस्थेला दिले आहे.

दरम्यान पाटील यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत पुढील काही आठवड्यांत संपणार असताना २५ फेब्रुवारी रोजी अचानक महसूल व वन विभागाने महेश पाटील यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती दिली आणि महापालिकेच्या अपर आयुक्तपदी प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. प्रशासकीय निकड म्हणून सार्वजनिक सेवेच्या लोकहितास्तव ही नियुक्ती केल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Pune : नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय?

नाव अपर आयुक्त, काम अतिरिक्त पदाचे

महेश पाटील यांना अपर आयुक्तपदावर पदोन्नती मिळालेली असली तरी ते पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाचेच काम करण्याची शक्यता आहे. आता त्यामुळे कोणते महत्त्वाचे विभाग पाटील यांच्याकडे जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींचे अपयश

राज्य सरकारने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र त्यातून पुणे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळालेला नाही. पुणे शहरातील समस्या वाढत असताना योग्य नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची गरज आहे. तरीही राज्य सरकार या नियुक्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. हे पुण्यातील लोकप्रतिनिधींचेही अपयश आहे.

Pune : सरकारच्या सांगण्यावरून महापालिकेला 'या' कामासाठी मोजावे लागणार 95 कोटी

'आयएएस' दर्जासाठी अधिकाऱ्यांमध्ये महेश पाटील यांचे नाव आहे. पुढील महिन्यात त्यांना आयएएस दर्जा मिळेल, त्यामुळे ही नियुक्ती झाली आहे.

- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama