Dailyhunt
Pune : सरकारच्या 'त्या' आदेशामुळे पुणे महापालिका प्रशासन संभ्रमात

Pune : सरकारच्या 'त्या' आदेशामुळे पुणे महापालिका प्रशासन संभ्रमात

Mantralaya

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) आकृतिबंधात अपर आयुक्त हे पदच नसताना महसूल विभागाने या पदावर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढला आहे. पण आदेशाच्या अंमलबजावणीवरून महापालिका प्रशासनात संभ्रम असल्याने आता याबाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे.

(Pune Municipal Corporation News)

शिवशाही बसचा प्रवास... नको रे बाबा! काय आहे कारण?

पुणे महापालिकेचा कारभार हा नगर विकास विभागामार्फत चालविला जातो. महापालिकेच्या आकृतिबंधात आयुक्त, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अशी पदे आहेत.

महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या काही अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती प्रस्तावित केली आहे. त्यामध्ये महापालिकेत कार्यरत असणारे उपायुक्त महेश पाटील यांचाही समावेश आहे.

'या' पुलामुळे पुणे ते शिरूर अंतर अवघ्या 80 मिनिटांत पार करता येणार

पाटील यांना अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देताना त्याच वेळी त्यांना पुणे महापालिकेच्या अपर आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा आदेश महसूल विभागाने काढला आहे. त्यामुळे महापालिकेने अपर आयुक्त पदाच्या नियुक्तीबाबत व कामकाजाबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवून त्यावर मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप त्यावर कोणतेही उत्तर आलेले नाही, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना निगडीनंतर आता चाकणपर्यंत मिळणार दुसरा मार्ग

नगरविकासच्या पत्राकडे दुर्लक्ष

राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांचा कारभार नगरविकास विभागाच्या नियंत्रणाखाली चालतो. त्या ठिकाणी अधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकार या विभागाच्या अधिकाऱ्‍यांना आहेत. पण अनेकदा परस्पर अन्य विभाग या ठिकाणी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. त्यामुळे प्रशासकीय कामात पेच प्रसंग निर्माण होतो.

नगरविकास विभागाच्या पत्राशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांना रुजू करून घेऊ नये असे पत्र नगरविकास विभागाने यापूर्वीच काढले आहे. दरम्यान राज्यात महसूल विभाग सध्या भाजपकडे आहे. तर नगरविकास विभाग हा शिवसेनेकडे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama