Dailyhunt
Pune : तब्बल 49 मिळकतींवर महापालिकेने का केली जप्तीची कारवाई?

Pune : तब्बल 49 मिळकतींवर महापालिकेने का केली जप्तीची कारवाई?

Pune, PMC

पुणे (Pune) : मिळकतकराची थकबाकी भरण्यासाठी नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे सिंहगड इन्स्टिट्यूटला चांगलेच भोवले आहे. (Pune Sinhagad Institute Property Tax News)

'या' पुलामुळे पुणे ते शिरूर अंतर अवघ्या 80 मिनिटांत पार करता येणार

संस्थेच्या एरंडवणे, वडगाव बुद्रुक व कोंढवा बुद्रुक येथील एकूण ४९ मिळकतींवर महापालिकेने जप्तीची कारवाई केली.

या मिळकतींचा २६६ कोटी रुपयांचा मिळकतकर संस्थेने थकविला आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या शहरात आंबेगाव बुद्रुक, कोंढवा बुद्रुक व एरंडवणे येथे महाविद्यालये, शाळा, संस्थेची कार्यालये अशा मिळकती आहेत. संस्थेच्या विविध ठिकाणच्या मिळकतींचा एकूण तब्बल ३४५ कोटी रुपयांचा मिळकतकर थकीत आहे.

शिवशाही बसचा प्रवास... नको रे बाबा! काय आहे कारण?

महापालिकेच्या मिळकतकर आकारणी विभागाने संस्थेला थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतरही संस्थेकडून थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, महापालिकेने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एरंडवणे येथील संस्थेचे मुख्य कार्यालय जप्त केले होते. संबंधित कार्यालय व मिळकतीची ४७ कोटी ४३ लाख इतकी थकबाकी होती.

ही थकबाकी भरण्याकडेही दुर्लक्ष केल्यानंतर महापालिकेने एरंडवण्यातील कार्यालयाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यापाठोपाठ महापालिकेने मंगळवारी वडगाव बुद्रुक येथील ४३, तर कोंढवा बुद्रुक येथील ६ मिळकती जप्त केल्या असून या सर्वांची एकूण थकबाकी २६६ कोटी रुपयांहून अधिक आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना निगडीनंतर आता चाकणपर्यंत मिळणार दुसरा मार्ग

तसेच यापूर्वी देखील महापालिकेने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अन्य मिळकती जप्त केलेल्या आहेत. काही मिळकतींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही.

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विविध मिळकतींचा कर अनेक वर्षांपासून थकीत आहे. नोटीस बजावनूही त्यांनी थकबाकी भरलेली नाही. यापूर्वी एरंडवणे आणि आता वडगाव बुद्रुक व कोंढवा बुद्रुक येथील कार्यालये, मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

- माधव जगताप, उपायुक्त, मिळकतकर आकारणी विभाग

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama