नाशिक (Nashik): महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सर्व इंटरचेंज परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे २०४ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यामुळे समृद्धी महामार्ग देशातील पहिला पथदर्शी सौरऊर्जा प्रकल्प म्हणून उदयास येणार आहे.
Nashik ZP: नाशिक जिल्ह्यातील 'त्या' 276 ग्रामपंचायतींसाठी खुश खबरपहिल्या टप्प्यात वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात ९ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणी केल्यानंतर आता दुस-या टप्प्यात ११५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सौरऊर्जा प्रकल्पातून २५ वर्षे वीज विक्री करता येणार असून या २०४ मेगावॅटच्या प्रकल्पांतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला वर्षाला दोन कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाज आहे.
नाशिकमधील Startup Ecosystem बाबत काय आली गुड न्यूज?नागपूर-मुंबई जोडणारा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास पावणेतीन कोटी वाहनांनी त्याचा वापर केला आहे. हा महामार्ग उभारतानाच महामार्गाच्या नियोजनापासूनच त्यावरून जलद प्रवास होण्याबरोबरच सौरऊर्जा निर्मितीचा उद्देश ठेवण्यात आला होता. समृद्धी महामार्ग हा जमिनीपासून उंचावर असल्याने त्याच्या दक्षिण बाजूच्या उतारावरून सौरवीज निर्मिती करणे सहज शक्य आहे.
त्यानुसार महामार्गावरील विविध इंटरचेंजवर एकूण २०४ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात वाशिममधील कारंजा (लाड) आणि बुलढाणामधील मेहकर येथे ९ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यातील कारंजालाड प्रकल्पातून ३ मेगावॅट आणि मेहकर येथील प्रकल्पातून २ मेगावॅट वीज उत्पादन २०२५ मध्ये सुरू झाले आहे.
Nashik ZP: जलसंधारण विभागात बेफिकिरीचा कहर; टेंडरची मंजूर फाईल फाडून मर्जीतील ठेकेदारावर मेहेरबानीहे सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी ही कंपनी स्थापन केली आहे. महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी कंपनी व महावितरण कंपनी यांच्यात २०२२ मध्ये झालेल्या करारानुसार ही सौरवीज विक्री केली जाणार आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेनुसार ही सौरवीज प्रति युनिट ३.०५ रुपये या दराने महावितरणला विक्री केली जाणार आहे.
रस्ते विकास महामंडळाने पहिल्या टप्प्यात ९ मेगावॅट क्षमतेचे दोन सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर आता ११५ मेगावॅट क्षमतेचे सहा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी किमान दहा मेगावॅट प्रकल्प उभारणीचा अनुभव असलेल्या पात्र कंपन्यांना यात सहभाग घेता येणार आहे.
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'च्या टेंडरचे आकडे कुणासाठी फुगवले? CAG, राज्य सरकारकडून चौकशी सुरूसमृद्धी महामार्गावर साधारण २४ इंटरचेंज आहेत. त्यातील काही इंटरचेंज परिसरात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून दुस-या टप्प्यात सिंधी, धामणगाव, यवतमाळ, कारंजा, मेहेकर, शिंदखेड राजा या सहा इंटरचेंजवर ११५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहे.
प्रकल्पनिहाय वीजनिर्मिती
सिंधी - ४ मेगावॅट
धामणगाव रेल्वे - १९.३ मेगावॅट
यवतमाळ - २९.५ मेगावॅट
कारंजा - २८.५ मेगावॅट
मेहेकर - २३.५ मेगावॅट
शिंदखेडराजा - १३ मेगावॅट

