Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

हाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.

तुकाराम मुंडे यांची कारवाई! दुधात भेसळ करणाऱ्यांना १० लाख रुपयांचा दंड

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कालपासून सौम्य ताप, अशक्तपणा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांची नियमित तपासणी सुरू आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कोणतेही कारण नाही आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.

अहिल्यानगरमध्ये ५० मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली

गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील वारंवारचे दौरे आणि सरकारी बैठकांमुळे त्यांना विश्रांती घेता आली नाही, ज्यामुळे शारीरिक अशक्तपणा आणि ताप आला आहे. पुढील काही दिवसांतील त्यांचे सर्व सरकारी दौरे, बैठका आणि राजकीय कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.

शनिवारी मुंबई आणि ठाण्यासह चार शहरांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

Edited By- Dhanashri Naik
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi