पुणे : पुणे शहरातील हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला एटीएसने अखेर नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. हडपसर येथील हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब (IED) ठेवून शहरात खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात अखेर मोठे यश आले आहे.
या प्रकरणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक रागातून आरोपीने रुग्णालयाला लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. मात्र, यामागचे खरे कारण चौकशीनंतरच समोर येईल.
यापूर्वीच्या तपासात पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. तसेच सीसीटीव्हीतील संशयित हालचाली पाहून 15 ते 18 जणांनी चौकशीही करण्यात आली होती. आता अखेर तांत्रिक पुराव्यांमुळे आरोपीची ओळख पटली असून, अखेर त्याला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, 'उषाकिरण सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल'च्या पुरुष स्वच्छतागृहात बुधवारी सायंकाळी एक जिवंत बॉम्ब सापडला होता. वेळेवर तो निकामी करण्यात आला. तपासासाठी एटीएस (ATS) आणि आयबी (IB) सारख्या यंत्रणाही तैनात होत्या. हा बॉम्ब कोणी ठेवला आणि याचा दहशतवादासोबत काही संबंध आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
पुणे बॉम्ब स्फोटातील जामिनावरील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या…
पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक…
पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

