अहिल्यानगर : श्रीरामपूर येथे दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्या. यानंतर तातडीने जहागिरदारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान जहागिरदारचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागिरदार याच्यावर आरोप होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये बंटी जहागिरदार यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती आहे. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार 2023 पासून जामिनावर बाहेर आहे. बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबार झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

दुपारी कब्रस्तानातून परत येत असताना जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर पसार झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर दुचाकीवरून पळून जाताना सीसीटीव्ही दिसत आहेत. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ऑगस्ट २०१२ मध्ये पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या स्फोटाच्या गुन्ह्यात बंटी जहागिरदार याला अटक करण्यात आली होती. याशिवाय श्रीरामपूरमध्ये इतरही गुन्हे दाखल असल्याने त्याला अनेकदा तडीपार करण्यात आले होते. पूर्वी राजकारणातही सक्रीय असल्याने आजचा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचे श्रीरामपूरमध्ये पडसाद उमटले आहेत.
राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात बंटी जहागीरदार याच नाव असल्याने नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…
आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…
पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

