Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक.

पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक.

पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५, रा.

कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

जुबेर हंगरगेकर याच्याकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. हंगरकेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आली आहेत. जुबेरच्या संपर्कात कोणी आहे का आणि आणखी कोणाला अल् कायद्याचे सदस्य होण्यासाठी त्याने माहिती दिली आहे का? याचा तपास एटीएस कडून केला जात आहे. जुबेर हंगरगेकर उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत लाखो रुपयांचे पॅकेज तो घेतो.

एटीएस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील विविध ठिकाणी ९ ऑक्टोबर रोजी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले असून, असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जप्त केलेल्या सर्व उपकरणांचे सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून, त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पुणे न्यायालयाने आरोपी जुबेर हंगरगेकर याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, सध्या कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तसेच त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते. पोलिसांकडून त्याच्या मित्राचीही चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जाईल. तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, हेही तपासले जात आहे.

पुणे ! कोंढव्यात ATS आणि पुणे पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन; संशयित ताब्यात…

पुणे! गजा मारणे टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…

पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…

Loading…

The post पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka