Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अग्रणी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

अग्रणी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली : अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग-हरोली यांच्या वतीने विविध साहित्य पुरस्कारांसाठी साहित्यकृती मागविण्यात येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कवी दयासागर बन्ने आणि विद्यमान अध्यक्ष भरत खराडे यांनी दिली आहे.

जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांमध्ये कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी तसेच समग्र साहित्य या विभागांचा समावेश असून पुरस्कार वितरण नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अग्रणी साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. लेखकांनी प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती व अल्प परिचय पाठवावा. पुस्तके पाठविण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२६ अशी आहे. पुरस्कारासाठी फक्त प्रथम आवृत्तीची पुस्तके ग्राह्य धरली जाणार असून द्वितीय आवृत्ती स्वीकारली जाणार नाही. समग्र पुरस्कारासाठी सर्व साहित्य प्रकारांतील कलाकृती स्वीकारल्या जाणार असून त्यातून उत्कृष्ट कलाकृतीची निवड केली जाईल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच शाल-श्रीफळ असे राहणार आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता :

मनीषा पाटील-हरोलीकर,
कार्यवाह, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान
मु.पो. देशिंग-हरोली
ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली
पिन कोड - ४१६४१०

संपर्क : दयासागर बन्ने - ९९६०७२४२७७
संस्थापक अध्यक्ष, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग-हरोली.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari