Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरीस 'सुचेतस आर्ट्स'तर्फे साहित्य पुरस्कार

उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरीस 'सुचेतस आर्ट्स'तर्फे साहित्य पुरस्कार

पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने 'सुचेतस आर्ट्स'तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या पुरस्कारासाठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

पुरस्कारासाठी प्राप्त होणाऱ्या साहित्यकृतींचे परीक्षण लेखनशैली, शुद्धलेखन (प्रूफ चेकिंग), धाटणी (जॉनर) आणि साहित्याचा दर्जा या निकषांवर करण्यात येणार आहे. कथासंग्रह आणि कादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती तसेच लेखकाचा किंवा प्रकाशकाचा संक्षिप्त परिचय पुरस्कारासाठी पाठवावा, असे आवाहन सुजेतस आर्ट्सकडून करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह व कादंबरी ३० जून २०२६ पूर्वी पाठवाव्यात. निवड झालेल्या पुस्तकांच्या लेखकांना अथवा प्रकाशकांना रोख रक्कम, कादंबरीसाठी कै. सर्जेराव माने स्मृती पुरस्कार व कथासंग्रहासाठी कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) स्मृती पुरस्कार देण्यात येईल.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता : श्री. अमेय पिसाळ, सर्व्हे नं. ५९/२ अ, प्लॉट नं. ३६, ओम कॉलनी, लेन नं. २, बिजलीनगर, हनुमान स्वीट्सजवळ, चिंचवड, पुणे - ४११०३३.

अधिक माहितीसाठी संपर्क : सुचेतस आर्ट्स - ९९२१०९५५४२.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेकडून विविध पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari