Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

  • सोशल मिडियावर लोकप्रियता मिळवलेल्या तरुणीच्या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
  • कुटुंबासह व्यवसाय आणि ऑनलाईन जगात यशस्वी वाटचाल सुरू असतानाच घडलेल्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
  • आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या रील्सस्टार महिलेने रिअल लाईफमध्ये गळफास घेऊन आत्महत्याकेल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) असे मृत रील्सस्टार विवाहितेचे नाव असून, मंगळवारी दुपारी स्वतःच्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. रोहिणी पाराध्ये या पती निलेश पाराध्ये यांच्यासह ब्रम्हपुरी येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत त्यांच्या मालकीचे “हॉटेल ग्रामपंचायत” हे हॉटेल चालवत होत्या. याच हॉटेलच्या किचनमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

Raigad Crime: उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली अन् थेट जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली…

सोशल मीडियावरून मिळवली होती वेगळी ओळख

रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर विनोदी, सामाजिक तसेच खाद्यसंस्कृतीवरील रील्समुळे चांगलेच लोकप्रिय झाले होते, त्यांच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता, त्यातूनच त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यवसाय आणि सोशल मीडियावर यशस्वी वाटचाल सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

कारण समोर आलं नाही

ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची मंगळवेढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. रोहिणी यानी रील्सच्या माध्यमातून अल्पावधीतच प्रसिद्धीचे टोक गाठले होते, सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत. त्यांचे कौटुंबिक आयुष्य सुद्धा उत्तम चालले होते. असे असताना त्यानी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? यासंदर्भातच तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra