आसाम दौऱ्यादरम्यान मंदिराला दिली होती भेट
संगीतकार आणि गायक सलीम मर्चंट नुकतेच आसाममधील आई कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
सलीम मर्चंट यांनी इंस्टाग्रामवर मंदिरातील काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यामध्ये ते आपल्या मित्रासोबत हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे.
या छायाचित्रांमध्ये सलीम यांनी पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. त्यांच्या गळ्यात माळ असून खांद्यावर लाल उपरणे आहे. सोशल मीडिया अकाउंटवर ही छायाचित्रे शेअर करताना सलीम यांनी हिंदीत लिहिले, 'शक्तीच्या चरणी, ॐ ऐं ह्रीं क्लीं कामाख्या नमः।'
सलीम मर्चंट यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही यूजर्स त्यांचे कौतुक करत आहेत, तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. एका बाजूला सलीम यांच्या अन्य धर्माबद्दलच्या आदरभावाचे कौतुक केले जात आहे, तर काही कमेंट्समध्ये त्यांच्या धार्मिक ओळखीचा उल्लेख करत त्यांनी हे सर्व करण्यास परवानगी नसल्याचे म्हटले आहे.
परीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या
परकीय चलनसाठ्यात ४.९२ अब्ज डॉलरची घट
रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ
राहुल गांधींना काँग्रेसचाच इतिहास माहीत नाही!
मात्र, एखाद्या व्यक्तिमत्त्वाला अशा प्रकारच्या टीकेला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. गायक सलीम मर्चंट यांचा हिंदू देवी-देवतांवर विश्वास असून ते पूजाअर्चाही करतात. गायकाने यापूर्वीही आपण भगवान शिवावर श्रद्धा ठेवत असल्याचे सांगितले आहे. तसेच ते दर सोमवारी पूजा करतात. त्याचबरोबर शुक्रवारी जुम्म्याची नमाजही अदा करतात.
आपण दोन्ही धर्मांचा आदर करतो आणि ईश्वर तसेच संगीताशी असलेले आपले नाते शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. संगीतकार आणि गायक सलीम मर्चंट हे त्यांचे धाकटे भाऊ सुलेमान मर्चंट यांच्यासोबत लोकप्रिय 'सलीम-सुलेमान' या जोडीसाठी ओळखले जातात. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील ४० हून अधिक चित्रपटांना संस्मरणीय संगीत आणि बॅकग्राउंड स्कोअर दिले आहेत.
त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'चक दे! इंडिया', 'फॅशन', 'बँड बाजा बारात', 'रब ने बना दी जोडी' आणि 'कुर्बान' यांचा समावेश आहे. त्यांनी फिफा विश्वचषकासारख्या जागतिक मंचांवर आणि विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही सादरीकरण केले आहे.

