सुधांशू त्रिवेदींनी केला हल्लाबोल
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाने अंतरिम स्वरूपात निर्बंध घातल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.
या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्याला उत्तर देताना भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधींनी आधी काँग्रेसचा इतिहास माहीत करून घ्यावा. तृणमूल, राष्ट्रवादी हे काँग्रेसमधूनच फुटून तयार झालेले पक्ष आहेत.
टीएमसीच्या नाव आणि चिन्हावर निर्बंध घातल्यानंतर राहुल गांधी यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये या निर्णयावर टीका केली. त्यांनी याला केवळ ममता बॅनर्जी यांची लढाई नसून लोकशाही आणि जनादेशाच्या संरक्षणाची लढाई असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचा आरोप केला.
विसर्जनानंतर घरी जाण्याची चिंता मिटली!
मुंबई-गोवा महामार्गाचा खर्चात साडेपाच हजार कोटींची वाढ
गणेशोत्सव, दहीहंडी ठरणार 'अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा'
भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये 'आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस' असा उल्लेख करत भाजपवर आरोप करण्याचा प्रयत्न केल्याचे त्रिवेदी म्हणाले. त्रिवेदी यांनी दावा केला की, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची स्थापना काँग्रेसमधून फुटून झालेली आहे. काँग्रेसने आपल्या इतिहासात अनेक पक्षांमध्ये फूट पाडल्याचा आरोपही त्यांनी केला.
सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करताना चौधरी चरणसिंह यांच्या सरकारचा दाखला दिला. जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर चरणसिंह यांना पाठिंबा देण्यात आला; मात्र संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच तो पाठिंबा मागे घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसने चौधरी चरणसिंह, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा आणि आय. के. गुजराल यांच्या सरकारांना पाडण्याचे काम केल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला. तसेच कम्युनिस्ट पक्ष वगळता अनेक राज्यांमध्ये निवडून आलेल्या सरकारांना पूर्ण कार्यकाळ मिळू दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्रिवेदी यांनी १९८० मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर नऊ राज्यांतील सरकारे बरखास्त करण्यात आल्याचा आरोप केला. १९८९ मध्ये एस. आर. बोम्मई यांच्या सरकारच्या बरखास्तीचाही त्यांनी उल्लेख केला. राहुल गांधींना स्वतःच्या पक्षाचा इतिहास माहिती नसल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला. काँग्रेसच्या इतिहासात अनेक नेत्यांशी संबंधित राजकीय घडामोडी झाल्या असून, त्याकडे राहुल गांधी यांनी लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.

