Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आजी-आजोबांची हत्या करून विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार; सात जणांचा मृत्यू

आजी-आजोबांची हत्या करून विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार; सात जणांचा मृत्यू

NEWS डंका 2 weeks ago

थायलंडमधील घटना; आरोपी विद्यार्थ्याने केली आत्महत्या

थायलंडची राजधानी बँकॉकजवळील डेबसिरिन नॉनथाबुरी शाळेत शुक्रवारी (७ ऑगस्ट) घडलेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

एका विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरात अंधाधुंद गोळीबार करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह सात जणांचा बळी घेतला, तर या घटनेत किमान १५ जण जखमी झाले. गोळीबारानंतर आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जाण्यापूर्वी आरोपीने स्वतःच्या आजी-आजोबांची त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर तो बंदूक घेऊन थेट शाळेत पोहोचला आणि विद्यार्थी व शिक्षकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या संपूर्ण हल्ल्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. गोळीबार सुरू होताच अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी वर्गखोल्यांचे दरवाजे बंद करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी बाकाखाली लपून जीव वाचवला, तर काहींना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी तातडीने पोलिस, विशेष पथके आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने २६ गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावरून आणखी ३४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वापरण्यात आलेले शस्त्र आरोपीच्या कुटुंबातील सदस्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज असून, ते त्याच्या ताब्यात कसे आले याचा तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. थायलंडमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालय कधी सुरू होणार? राजेश शर्मांची अवमान याचिका

छापखान्यातून नव्हे, प्रश्नपत्रिका तयार करतानाच फोडला नीटचा पेपर

सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी 'इस्लामिक नाटो'?

भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला 'टॉप गन'

थायलंडचे पंतप्रधान यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर थायलंडमध्ये शस्त्र नियंत्रणाचे कायदे आणि शाळांमधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा चर्चेत आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka