Dailyhunt
अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनी ठार

अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनी ठार

NEWS डंका 2 months ago

ध्यपूर्वेत अनेक दशकांतील सर्वात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी घोषणा केली की इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा तेहरानवरील संयुक्त अमेरिके-इस्रायल हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

इराणनेही याची पुष्टी केली असून ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

ट्रुथ सोशल वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले: 'इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींमध्ये एक असलेले खामेनेई आता मृत झाले आहेत.' त्यांनी दावा केला की अत्याधुनिक ट्रॅकिंग प्रणालींच्या साहाय्याने त्यांचा मागोवा घेण्यात आला आणि ही कारवाई 'इराणी जनतेला त्यांचा देश परत मिळवण्याची सर्वात मोठी संधी' असल्याचे म्हटले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की ८६ वर्षीय नेते 'आता हयात नाहीत' असे अनेक संकेत आहेत.

इराणने अधिकृतरीत्या त्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. मात्र वरिष्ठ अधिकारी Ali Larijani यांनी अमेरिका आणि इस्रायल 'आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप करतील' असा इशारा देत सशस्त्र दलांकडून 'अविस्मरणीय धडा' दिला जाईल असे म्हटले. काही तासांतच इस्रायल आणि आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले.

खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नातू हल्ल्यात ठार

फार्स न्यूज एजन्सी (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संलग्न) ने वृत्त दिले की खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नातू हल्ल्यात ठार झाले. सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयातील 'विश्वसनीय सूत्रां'चा हवाला देत ही माहिती देण्यात आली. एका सूनबाईचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी काही मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्या नंतर फेटाळण्यात आल्या.

एनएसईमध्ये गुंतवणूकदारांची खाती २५ कोटी (२५० दशलक्ष)

श्रीलंका हरला; तरी पाकडे चालले घरला!

एमएमआरमध्ये आयुष्मान, जनआरोग्य योजनांसाठी रुग्णालयांची नोंदणी वाढवणार

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या ४१ विद्यार्थिनींचा मृत्यू

नव्या नेत्याच्या नियुक्तीसाठी IRGCचा दबाव

इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून खामेनेई यांच्या मृत्यूनंतर तातडीने नव्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी (१ मार्च) पहाटेपर्यंत निर्णय अंतिम करण्याचा प्रयत्न आहे. सततच्या हवाई हल्ल्यांमुळे सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या घटनात्मक संस्थेची बैठक घेणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे IRGC औपचारिक प्रक्रियेबाहेर जाऊन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. इराणच्या सुरक्षा यंत्रणेत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचेही वृत्त आहे.

खामेनेई यांना कसे लक्ष्य करण्यात आले?

तेहरान वेळेनुसार सकाळी सुमारे 09:30 वाजता हल्ले सुरू झाले. खामेनेई यांच्या कडेकोट सुरक्षा असलेल्या लीडरशिप हाऊस परिसरात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. उपग्रह चित्रांमध्ये त्या परिसरातील जळालेल्या इमारती आणि ढिगारा दिसून आला. इस्रायली अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की हा 'अत्यंत शक्तिशाली आणि अचानक हल्ला' होता ज्यात संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka