१९ वर्षीय तरुणाला अटक
अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील अरोरा येथे हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या प्रकरणी १९ वर्षीय अलेक्झांड्रोस पापोराकिस याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून श्वेतवर्णीय वर्चस्ववादी विचारसरणी व्यक्त करणारा आणि भारतीय वंशाच्या लोकांविरोधात हिंसाचाराचा उल्लेख असलेला जाहीरनामा सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी हिंदू प्रार्थनास्थळावर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याचा संशय होता. पॅलाटाईन येथील रहिवासी असलेल्या पापोराकिसविरोधात एका व्यक्तीने चिंताजनक इलेक्ट्रॉनिक संदेश मिळाल्याची तक्रार केली होती. माउंट प्रॉस्पेक्ट पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर कथित हल्ल्याची रूपरेषा असलेला दस्तऐवज आणि शस्त्रांची छायाचित्रे समोर आली. 'मी का लढलो: उर्फ अरोरा हल्लेखोराचा जाहीरनामा' या शीर्षकाच्या दस्तऐवजात दक्षिण आशियाई, विशेषतः भारतीय वंशाच्या लोकांविरोधात हिंसाचाराचे उल्लेख असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी संशयिताला त्याच्या घरातून बाहेर पडताना अटक केली. घराच्या झडतीत रायफल, अनेक भरलेली मॅगझिन्स, शेकडो काडतुसे, शरीराचे संरक्षण करणारे कवच आणि सामरिक उपकरणे जप्त करण्यात आली. श्वेतवर्णीय वर्चस्ववादी अतिरेकी विचारसरणीशी संबंधित प्रतिमांचे चिन्हही आढळले.
संभाव्य धोका लक्षात घेऊन अरोरा पोलिसांनी परिसरातील हिंदू प्रार्थनास्थळांना सतर्क केले. या प्रकरणी संशयितावर दहशतवादी धमकी देणे आणि १६ इंचांपेक्षा कमी लांबीची नळी असलेली रायफल बाळगण्यासह बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने त्याला ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले असून, ३० ऑक्टोबर रोजी पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रथमच वडील मला थेट मैदानावर खेळताना पाहतील!
सौदी अरेबियातल्या श्रीलंकन हिंदू तरुणाची फाशी रद्द
मुक्त व्यापार करारांमुळे भारताला १४० अब्ज डॉलरचा फायदा?
आशुतोष रांका, सौरव दासला पाच दिवसांसाठी पाठवले तिहार तुरुंगात
पोलिस एफबीआयसोबत पुढील तपास करत आहेत. कथित हल्ल्यासाठी नेमके कोणते ठिकाण निश्चित केले होते, याचा शोध सुरू आहे. सध्या जनतेला असलेला कोणताही ज्ञात आणि सततचा धोका आढळलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने कारवाईचे स्वागत करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

