Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बलुच सशस्त्र महिलांनी केला नऊ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

बलुच सशस्त्र महिलांनी केला नऊ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

NEWS डंका 3 weeks ago

नऊ पाकिस्तानी जवान ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या बलुच लिबरेशन फ्रंटने (बीएलएफ) आपल्या नव्या महिला लढाऊ युनिटच्या सशस्त्र कारवायांचा व्हिडीओ जारी केला आहे. 'करीमा आर्म्ड असॉल्ट डिव्हिजन' म्हणजेच 'काड' या महिला युनिटने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यांवर हल्ले केल्याचा दावा बीएलएफने केला आहे.

या कारवायांमध्ये एकूण नऊ पाकिस्तानी लष्करी कर्मचारी ठार झाल्याचा संघटनेचा दावा आहे.

बीएलएफच्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी बलुचिस्तानमधील केच जिल्ह्यातील तुर्बतजवळ जसाक परिसरात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या (CPEC) मार्गावर पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या ताफ्यात तीन वाहने होती. त्यापैकी एका क्विक रिस्पॉन्स फोर्सच्या ताफ्यावर 'काड'च्या महिला लढवय्यांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात सहा पाकिस्तानी लष्करी कर्मचारी ठार आणि काही जण जखमी झाल्याचे बीएलएफने म्हटले आहे. लष्कराची काही वाहनेही या हल्ल्यात नुकसानग्रस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान बीएलएफच्या 'कुरबान' युनिटनेही 'काड'ला मदत केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला

तृणमूलचे इंद्रनील सेन यांच्या घरावर ईडीची धाड

अमेरिकेत भारतीय उद्योगसमूह एस्सारचा 'पोलादी' विस्तार

उज्जैनमधील मशिदीच्या वादात एआय व्हिडीओने पेटवली अफवांची ठिणगी

बीएलएफने त्यानंतर बलुचिस्तानमधील कालात जिल्ह्यातील मंगुचर परिसरातील आणखी एका कारवाईची माहिती दिली. २५ सप्टेंबर रोजी क्वेटा-कराची महामार्गावर महिला लढवय्यांनी तीन ठिकाणी नाकेबंदी केली आणि वाहनांची तपासणी केल्याचा दावा संघटनेने केला. या वेळी मंगुचर बाजाराच्या दिशेने येणाऱ्या पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्याचे बीएलएफने म्हटले आहे. या कारवाईत दोन लष्करी कर्मचारी ठार झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या चकमकीत आणखी एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे तुर्बत आणि मंगुचरमधील कारवायांमध्ये एकूण नऊ पाकिस्तानी लष्करी कर्मचारी ठार झाल्याचा दावा बीएलएफने केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka