मोदी-पेझेश्कियान भेटीनंतर अमेरिकेचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात झालेल्या भेटीनंतर अमेरिकेने इराणला मदत करणाऱ्या देशांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी कोणत्याही देशाने इराणला अमेरिकेचे निर्बंध चुकवण्यास किंवा उत्पन्नाचे मार्ग निर्माण करण्यास मदत करू नये, असे स्पष्ट केले आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट झाली होती. या भेटीनंतर भारत आणि इराणमध्ये एखादा नवा व्यापारी करार होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न रुबियो यांना विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रुबियो म्हणाले की, भारत आणि इराण यांच्यात सध्या कोणत्याही व्यापारी कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे आपल्याला वाटत नाही. मात्र, इराणवरील अमेरिकन निर्बंधांबाबत त्यांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. देश स्वतंत्र परराष्ट्र धोरणे अवलंबतात आणि तेहरानशी संपर्क ठेवतात हे त्यांनी मान्य केले. वॉशिंग्टनने स्वतः इराणी सरकारच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता, असे रुबियो यांनी नमूद केले.
'कोणत्याही देशाने इराणला निर्बंध चुकवण्यास मदत करू नये,' असा स्पष्ट इशारा रुबियो यांनी दिला. इराणला निर्बंध टाळण्यासाठी किंवा आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध करून देणाऱ्या देशांवरही अमेरिकेकडून कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. रुबियो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची यापूर्वीची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. इराणवरील निर्बंधांना बगल देण्यासाठी कोणत्याही देशाने सहकार्य करू नये, याबाबत अमेरिकेची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
कोलकात्यात तृणमूलचे कार्यालय फोडले
पाकिस्तानचे एफ-१६ पाडणारे अभिनंदन हवाई दलातून निवृत्त
'सरकारी शाळांच्या अवस्थेसाठी काँग्रेसवर अधिक राग'
पंजाबच्या मतदार यादीत राघव चड्ढा 'स्थलांतरित'
दरम्यान, मोदी आणि पेझेश्कियान यांच्या भेटीत भारत-इराण द्विपक्षीय संबंध, व्यापार सहकार्य आणि प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही देशांनी परस्पर संबंध अधिक मजबूत करण्याची भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. भारत आणि इराणच्या वाढत्या संपर्काकडे अमेरिकेचे बारकाईने लक्ष असल्याचेही या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे.

