Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'सरकारी शाळांच्या अवस्थेसाठी काँग्रेसवर अधिक राग'

'सरकारी शाळांच्या अवस्थेसाठी काँग्रेसवर अधिक राग'

NEWS डंका 2 weeks ago

सोनम वांगचुक यांची टीका

शिक्षण क्षेत्रातील दुर्लक्षाबाबत सर्वच सरकारांवर आपली नाराजी असल्याचे स्पष्ट करताना सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काँग्रेसवर अधिक तीव्र टीका केली आहे.

गरीब आणि वंचित घटकांच्या शिक्षणाकडे काँग्रेसने अनेक दशके पुरेसे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सोनम वांगचुक यांनी भारतातील सरकारी शाळांची सध्याची परिस्थिती केवळ मागील १० ते १२ वर्षांत निर्माण झालेली नसल्याचे म्हटले. देशातील शिक्षण व्यवस्थेच्या समस्यांसाठी केवळ सध्याच्या भाजप सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वांगचुक म्हणाले की, सत्तेत असलेल्या सर्वच सरकारांबद्दल आपल्याला नाराजी आहे. मात्र, गरीबांच्या शिक्षणाकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे काँग्रेसबद्दल आपली नाराजी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करताना वांगचुक यांनी विचारले, 'काँग्रेसने शिक्षण क्षेत्रात नेमके कोणते महान काम केले? जर सरकारी शाळा त्या काळात अत्यंत उत्तम स्थितीत असत्या, तर त्या आज इतक्या खराब अवस्थेत कशा पोहोचल्या असत्या?' सरकारी शाळांची अवस्था गेल्या दशकभरात अचानक खालावलेली नाही, तर ही समस्या अनेक वर्षांपासूनची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी पूर्वीच्या सरकारांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

पंजाबच्या मतदार यादीत राघव चड्ढा 'स्थलांतरित'

छोटा राजनच्या नावाने ११ कोटींची खंडणी मागणारी टोळी गजाआड

उबर करणार ३३०० नोकरकपात

प्रवेश नाकारल्यामुळे कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेचा गोंधळ

शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबाबत आपली टीका कोणत्याही एका राजकीय पक्षापुरती मर्यादित नसल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि प्रभावी सुधारणा करण्यासाठी सत्तेत आलेल्या सर्वच सरकारांनी अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka