Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय वैमानिकाची धाडसी कामगिरी चर्चेत; मोदी-नेतन्याहूंकडून कौतुक

भारतीय वैमानिकाची धाडसी कामगिरी चर्चेत; मोदी-नेतन्याहूंकडून कौतुक

NEWS डंका 3 weeks ago

फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हवेत असताना झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांचे धैर्य चर्चेत आले आहे. सहवैमानिकाने चाकूने हल्ला केल्यानंतर गंभीर जखमी होऊनही मच्छर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी मार्ग उपलब्ध करून दिला.

त्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी हल्लेखोराला आवरले, तर विमानातील इतर वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण घेतले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मच्छर यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छर यांना 'हिरो' संबोधत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. गंभीर जखमी असूनही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी दाखवलेले धैर्य आणि निर्धार यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच मच्छर यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मच्छर यांना 'नायक' म्हणून गौरवले. ते म्हणाले की, या भारतीय वैमानिकाच्या शौर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे '९/११ सारखी मोठी दुर्घटना' टळली आणि फ्लायदुबईच्या विमानातील लोकांचे प्राण वाचले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही मच्छर यांच्या धैर्याला सलाम केला. जखमी असूनही त्यांनी प्रतिकार केला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवासी व क्रूला हल्लेखोरावर नियंत्रण मिळवण्याची संधी दिली, असे नेतन्याहू यांनी म्हटले. या घटनेनंतर इस्रायलमध्ये सोशल मीडियावरही स्मित मच्छर यांच्या धैर्याचे कौतुक होत आहे. अनेक इस्रायली नागरिकांनी व्हिडीओ आणि पोस्टद्वारे भारतीय कॅप्टनचे आभार मानले. काहींनी त्यांचे नाव लक्षात ठेवण्याचे आवाहन करत त्यांच्या धैर्याला सलाम केला.

फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छर कोण?

इंडिया आघाडीच्या गर्दीत ममतांना कंठ फुटला

लवलीनाचा ठोसा, सुवर्णाची आशा

राजेश-चिकिथाचा सुवर्णवेध, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के!

हल्ला करणारा सहवैमानिक ओमानचा नागरिक असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले असून त्याला सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. मात्र हल्ल्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. विमानात १७४ प्रवासी होते. प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि सहवैमानिकामध्ये झटापट झाली. प्राथमिक माहितीनुसार, सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली. विमानाने आपत्कालीन संकेतही प्रसारित केले. अखेर विमान ताबुक विमानतळाकडे वळवण्यात आले आणि तेथे सुरक्षित लँडिंग झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka