Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भोंदू बाबा खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

भोंदू बाबा खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

NEWS डंका 3 weeks ago

आर्थिक गैरव्यवहारासंबंधी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात सातत्याने नवे धागेदोरे समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहाराचाही आयाम समोर आला आहे.

भोंदू खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पद आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. अशातच आता प्रतिभा चाकणकर यांना मोठा दणका बसला आहे. प्रतिभा चाकणकर यांना सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे.

भोंदूबाबा अशोक खरातने समता पतसंस्थेमधील खात्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल केल्याचे समोर आले होते. राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांतून तब्बल २ कोटी ४० लाखांची उलाढाल झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता. याच प्रकरणाच्या तपासासाठी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. यात प्रतिभा चाकणकर यांनी मुंबईतील झोन २ च्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या चौकशीतून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र म्हणजे शौर्य, भक्ती, सुधारणा, राष्ट्रनिर्मितीचा अद्वितीय संगम!

'आप'चे मुख्यमंत्री भगवंत मान झिंगलेल्या अवस्थेत?

सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!

'मिसिंग लिंक' नाही, तर 'कनेक्टिंग लिंक'!

काही दिवसांपूर्वी प्रतिभा चाकणकर यांनी आर्थिक व्यवहाराचे आरोप फेटाळत आपल्या नावाने बनावट खाती उघडण्यात आल्याचा दावा केला होती. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची संयुक्तपणे आठ तास चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या पैशांचा स्रोत काय आहे आणि अशोक खरात यांच्याशी त्यांचा आर्थिक व्यवहारांचा नेमका काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणी थेट ईडीचे अधिकारी आता प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka