Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प; शेकडो भाविक अडकले

भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प; शेकडो भाविक अडकले

NEWS डंका 3 weeks ago

अमरनाथ यात्रेचा परतीचा प्रवास ठप्प

म्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे आणि डोंगरावरून मोठ्या प्रमाणात दगड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

यामुळे अमरनाथ यात्रेवरून परतणारे शेकडो भाविक काझीगुंडमधील मीर बाजार येथील यात्री निवासात थांबून राहण्यास भाग पडले आहेत. बाबा बर्फानींचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांचा प्रवास महामार्ग बंद झाल्यामुळे मध्येच खोळंबला. अनेक भाविकांनी सांगितले की, ते गेल्या एक-दोन दिवसांपासून रस्ता सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ भाविकाने सांगितले की, अमरनाथ यात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाली. मात्र, परतीच्या मार्गावर महामार्ग बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही प्रशासनाने लंगर, निवास आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांची चांगली व्यवस्था केली असून सुरक्षा व्यवस्थाही समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, मीर बाजार येथील यात्री निवासात सध्या सुमारे १,००० ते १,५०० भाविक थांबले आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळत असली तरी महामार्ग सुरू होण्याचीच सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.

गोविंद कुमार या भाविकाने सांगितले की, यात्रेदरम्यान दर्शनासाठी कोणतीही अडचण आली नाही. मात्र, परतीच्या प्रवासात वाहतूक बंद झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते गेल्या एक दिवसाहून अधिक काळापासून मार्ग खुला होण्याची वाट पाहत आहेत. प्रशासन आणि सुरक्षा दलांची व्यवस्था चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंद कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना काझीगुंड येथे थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ते श्रीनगरला जाऊन एका हॉटेलमध्ये राहिले. मात्र, महामार्ग बंद असल्यामुळे पुढील प्रवास करता येत नसल्याने त्यांनी प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली.

फेसबुकवरून मोदींचा व्हिडिओ गायब; मेटाने चूक मान्य करत दिले स्पष्टीकरण

जंतर मंतर आंदोलनात २८७३ गुन्हेगार

अमरनाथ यात्रेवरून परतणारी बस गांदरबलमध्ये उलटली

उमर खालिद, शर्जील इमामच्या समर्थनार्थ फलक; महिलेविरोधात एफआयआर

दिल्लीतील प्रीती देवी यांनी सांगितले की, त्यांनी २३ जुलै रोजी अमरनाथ यात्रेला सुरुवात केली होती आणि २६ जुलै रोजी दर्शन पूर्ण केले. त्यानंतर त्या काझीगुंडमध्येच अडकून पडल्या आहेत. डोंगर कोसळल्यामुळे रस्ता बंद असल्याने भाविकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रीती देवी यांनी सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक करत सीआरपीएफ आणि पोलीस कर्मचारी सातत्याने भाविकांना मदत करत असल्याचे सांगितले. महामार्ग बंद असल्यानेच प्रवासात अडथळा निर्माण झाला असून, त्याशिवाय इतर कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka