Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ब्रिक्सच्या व्यासपीठावर मोदी-जिनपिंग भेटणार! गलवाननंतर प्रथमच आमनेसामने चर्चा

ब्रिक्सच्या व्यासपीठावर मोदी-जिनपिंग भेटणार! गलवाननंतर प्रथमच आमनेसामने चर्चा

NEWS डंका 1 month ago

द्विपक्षीय संबंध, सीमेवरील शांतता आणि व्यापारावर चर्चेची अपेक्षा

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.

१२ सप्टेंबर रोजी परिषदेला सुरुवात होत असून, त्याच दिवशी दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बैठक भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून जगाचे लक्षही या दोन्ही नेत्यांच्या बैठकीकडे असणार आहे.

विशेष म्हणजे, २०२० मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर शी जिनपिंग यांचा भारतातील हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे मोदी- जिनपिंग यांची प्रस्तावित भेट ही जवळपास सहा वर्षांनंतर भारताच्या भूमीवर होणारी त्यांची पहिली महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा ठरणार आहे. शी जिनपिंग यांचा भारत दौरा तब्बल सात वर्षांनंतर होत आहे. या बैठकीत भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः सीमेवरील परिस्थिती, वास्तविक नियंत्रण रेषेवरील म्हणजेच LACवरील शांतता आणि स्थैर्य, व्यापार तसेच आर्थिक संबंध हे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात.

अफगाण वैद्यकीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश

मुंबई विमानतळाजवळील अनधिकृत मशिदीवर चालणार बुलडोझर

सेन्सेक्स ८१३ अंकांनी कोसळला

प्रा.शोभिता जैन; हेवा वाटावे असे लखलखीत आयुष्य…

२०२० मधील गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंधांमध्ये मोठी घसरण झाली होती. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये दीर्घकाळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा केली. २०२४ मध्ये डेपसांग आणि डेमचोक भागातील सैन्य माघारीसंदर्भात महत्त्वाची प्रगती झाली आणि त्यानंतर उच्चस्तरीय संवादाला पुन्हा वेग आला. गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची विविध बहुपक्षीय व्यासपीठांवर भेट झाली आहे. मात्र, भारतात होणारी ही प्रस्तावित भेट विशेष महत्त्वाची आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka