ब्रिक्स परिषदेवरून केले कौतुक
माजी परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा गेल्या जवळपास दशकभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांचे प्रमुख टीकाकार राहिले आहेत. मात्र, रविवारी झारखंडमधील हजारीबाग येथे वृत्तसंस्था एएनआयने त्यांच्याकडे भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी या परिषदेच्या यशाची जंत्रीच मांडली.
मात्र, चीनच्या भूमिकेबाबत बोलताना सिन्हा यांनी सावध भूमिका घेतली. चीनवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तन्वी पत्रीने हमवतन शायनाचा पराभव करत जिंकले अंडर-१७ विजेतेपद
ब्रिक्स परिषदेत भारताचे विजयपंचक
भारतीय संघाने जिंकले ज्युनियर महिला आशिया कपचे विजेतेपद
सौदीची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन ड्रोन हल्ल्यानंतर बंद
मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक
माजी परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले की, 'गेल्या मे महिन्यात दिल्लीत परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यावेळी परस्पर मतभेदांमुळे संयुक्त घोषणापत्र जारी करता आले नव्हते. मात्र, यावेळी अधिकाऱ्यांनी अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत आणि अखेर सर्वसंमतीने एक संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आले आहे.'
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झालेल्या विविध द्विपक्षीय बैठकींमध्ये भारताने बजावलेल्या भूमिकेचेही सिन्हा यांनी जोरदार कौतुक केले. विशेषतः चीन आणि पश्चिम आशियाशी संबंधित विषयांमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला.
सिन्हा यांनी इराण युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या राजनैतिक परिस्थितीचाही उल्लेख केला.
पलेस्टिन मुद्द्यावर भारत पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक भूमिकेकडे परतताना दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले.
'चीनने पाठीत खंजीर खुपसला आहे'
मात्र, चीनबाबत यशवंत सिन्हा यांनी स्पष्टपणे सावधगिरीचा इशारा दिला. ते म्हणाले, 'माझे असे मत आहे की चीनने पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे चीनवर सहजासहजी विश्वास ठेवता येणार नाही.'
भारत आणि चीनदरम्यान संवाद सुरू राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, चीनवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यशवंत सिन्हा यांनी भारत आणि चीनमधील द्विपक्षीय चर्चेबाबतही महत्त्वाचे भाष्य केले. कदाचित या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात मतभेद निर्माण झाले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
याच कारणामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या डिनरला उपस्थित राहिले नसावेत, असेही सिन्हा यांनी म्हटले.

