Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो'

'दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो'

संजय राऊतांचे लोटांगण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून दिलगिरी व्यक्त केली आहे.

'माझ्या आयुष्यात मी कधीच न्यायालयाचा अवमान केला नाही. रागाच्या भरात एखादा शब्द इकडे-तिकडे गेला असेल; पण न्यायालयाचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे मन अस्वस्थ होते आणि चीड निर्माण होते. ही भावना केवळ आपलीच नसून देशातील लाखो लोकांमध्येही अशी नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला. त्याच रागातून एखादा शब्द तोंडून गेला असेल, तर आपण माफी मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिल्यानंतर राऊत यांनी न्यायाधीशांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले होते. न्यायाधीश भाजपच्या राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतात, तसेच मुख्यमंत्री न्यायाधीशांसाठी भोजनाचे आयोजन करतात, असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबर रोजी राऊत यांना त्यांच्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

निखिल वागळेंनी सर्वोच्च न्यायालयापुढे नाक घासले

मक्कातील मशिदीच्या पावित्र्यभंगाचा आरोप; दोन बांगलादेशींना फाशी

हवेत उडी, गिरकी आणि लँडिंग! टेस्लाची 'रोडस्टर' चर्चेत

अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ल्याची २ वर्षांपासून आखत होता योजना

दरम्यान, पत्रकार निखिल वागळे आणि संजय राऊत यांच्याविरोधात फौजदारी अवमानाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या कारवाईसाठी भारताचे ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी १५ ऑक्टोबर रोजी संमती दिली. दोघांची वक्तव्ये प्रथमदर्शनी सर्वोच्च न्यायालयाची आणि विशेषतः सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा कमी करणारी असल्याचे ऍटर्नी जनरल यांनी नमूद केले. यानंतर निखील वागळे यांनी संबंधित पोस्ट हटवून सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. तर संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka