Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुधासाठी रडणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा पित्याकडून खून

दुधासाठी रडणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा पित्याकडून खून

NEWS डंका 3 weeks ago

पवईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

वईतील मोरारजी नगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. दुधासाठी हट्ट करणाऱ्या ४ वर्षांच्या निरागस मुलाला शांत करण्याऐवजी, रागाच्या भरात पित्याने त्याचे डोके फरशीवर आपटून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पवई पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.

राजेश प्रकाश सिंह (२७) असे अटक करण्यात आलेल्या नराधम पित्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरारजी नगरमधील गौतम नगर परिसरात राजेश आपल्या कुटुंबासह राहत होता. राजेशला मद्यपानाचे गंभीर व्यसन असून, कोणतीही कामधंदा तो करत नव्हता. कौटुंबिक कलहामुळे त्याची पत्नी १५ दिवसांपूर्वीच त्याला आणि मुलांना सोडून निघून गेली होती. राजेशचा ५ वर्षांचा मोठा मुलगा शेजारी राहणाऱ्या आत्याकडे राहत होता, तर ४ वर्षांचा यश हा त्याच्यासोबत राहत होता. यश हा 'स्पेशल चाईल्ड' (विशेष बालक) होता.

शुक्रवारी पहाटे भूक लागल्यामुळे यश दुधासाठी रडू लागला. मुलाच्या रडण्याने राजेशची झोप मोडली. रागाच्या भरात असलेल्या राजेशने यशला पकडून आधी दरवाजावर आपटले आणि त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले. या क्रूर कृत्यामुळे यश गंभीर जखमी होऊन जागीच निपचित पडला. मुलाचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर, राजेशने सकाळी त्याच्या बहिणीच्या घरी जाऊन यश मृत झाल्याचे सांगितले.

वैभव सूर्यवंशी सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज - शुभमन गिल

रेतीच्या ढंगानी राजस्थानचे पाच जिल्हे व्यापले

बनावट सही प्रकरणी अभिषेक बॅनर्जींना सीआयडीचे समन्स

सुजलॉन एनर्जीला सेबीचा मोठा दणका

घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश हजारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यशला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुरुवातीला पोलिसांनी राजेशकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, खाक्या दाखवताच त्याने आपणच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. 'मुलगा दुधासाठी सारखा रडत होता, म्हणून रागाच्या भरात हे कृत्य केले,' अशी कबुली त्याने दिली. पवई पोलिसांनी राजेश सिंहविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. शुक्रवारी त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश हजारे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka