Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुष्काळमुक्तीचा वसा! शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर झटले नाना

दुष्काळमुक्तीचा वसा! शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर झटले नाना

NEWS डंका 2 weeks ago

'नाम'च्या कामातून उभी केली जलसंधारणाची चळवळ

पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर केवळ अभिनेते म्हणूनच नव्हे, तर शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही कायम स्मरणात राहतील.

महाराष्ट्रातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाने व्यथित झाल्यानंतर त्यांनी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत २०१५ मध्ये 'नाम फाउंडेशन'ची स्थापना केली. शेतकरी कुटुंबांना मदत करण्यापासून सुरू झालेली ही वाटचाल पुढे जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या मोठ्या चळवळीत रूपांतरित झाली.

२०१४-१५च्या काळात महाराष्ट्रातील अनेक भाग दुष्काळाच्या छायेत होते. शेतकरी आत्महत्यांच्या घटना समोर येत असताना नाना पाटेकर यांनी या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यावर भर होता. मात्र, केवळ आर्थिक मदत हा दीर्घकालीन उपाय नसल्याचे लक्षात आल्यानंतर 'नाम'ने पाणीप्रश्नाच्या मुळावर काम करण्यास सुरुवात केली.

याच विचारातून जलसंधारण, पाणी अडवणे आणि जमिनीत पाणी जिरवणे, नदी-नाले पुनरुज्जीवन, गाळ काढणे, कालवे दुरुस्त करणे, शेततळी तयार करणे आणि भूजलपातळी वाढवणे अशा कामांना प्राधान्य देण्यात आले. साठवलेल्या पाण्याचा आणि भूगर्भातील पाण्याचा समतोल वापर कसा करायचा, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यावरही संस्थेने भर दिला.

पडद्यावर सैनिक साकारला, पुढे कारगिलच्या रणभूमीवर केलेली सेवा

अंबानींवर निशाणा साधला; केंद्राने केला खुलासा

'मी उद्या इथे असेन की नाही, माहीत नाही'

पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींसह प्रियांका गांधींवर एफआयआर

'नाम फाउंडेशन'च्या माहितीनुसार, २०१५ ते २०२५ या काळात संस्थेने २,२४६ जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले. १७८ नद्यांचे पुनरुज्जीवन, ५१५ ओढे आणि नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, तसेच ७६९ पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या कामातून तब्बल ४०,८४७ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता निर्माण झाल्याचा संस्थेचा दावा आहे. या उपक्रमांचा ७७.१७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा झाला असून ३३.६९ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली, अशी माहिती संस्थेने दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka